शिवरूपराजे व धीरेंद्रराजे यांच्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे, व राजकीय स्क्रीप्ट मधून.
फलटण प्रतिनिधी – तुमच्यावर जप्ती ही बँकेच्या नियमानुसार आली, त्यामध्ये श्रीमंत शिवरुपराजे यांचा काढीचाही संभंध नाही मात्र तुम्ही स्वतःची आर्थिक वसुली थांबावी म्हणून संस्थेची व शिवरूपराजे व धीरेंद्रराजे यांची बदनामी करीत आहात, तुमचे सर्व आरोप हे बिनबुढाचे व राजकीय प्रेरित असून तुम्हाला स्क्रिप्ट कुठून वं कशी येते ती संपूर्ण गावासाह तालुक्यातील जनतेला माहिती आहे, तुम्ही आसू सह गावातील प्रत्येकाची इज्जत घालविली असून खर्डेकर यांच्यावरील तत्थहीन आरोप म्हणजे साक्षात सूर्यावर थुंकाण्याचा प्रकार आहे. तुम्ही सोशल मीडियावर दररोज धमकीचे मेसेज टाकताय दारू पाजून आरोप करायला लावताय पण एक लक्षात ठेवा तुमच्यातच धमक आहे असे समजू नका तुमच्या सर्व गोष्टी काढल्या तर तुम्हाला तोंड दाखविणे मुश्किल होईल असा प्रहार जेष्ठ मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते रघुवीर माने यांनी केला. दरम्यान आसूचे युवानेते विशालसिंह माने पाटील यांनी नुकतेच श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर व त्यांचे सुपुत्र श्रीमंत धीरेंद्रराजे यांच्यावर काळेश्वर दूध संस्थेचे नुकसान केले वं श्रीमंत धीरेंद्रराजे यांनी सचिव म्हणून वेतन घेतलेचा आरोप केला होता त्याला उत्तर देण्यासाठी व सत्य गावासाह तालुक्यातील जनतेला समजण्यासाठी आसू नं. 1 येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी रघुवीर माने बोलत होते यावेळी चेअरमन आसू नंबर एक रविंद्र पवार,चेअरमन काळेश्वर डेअरी आनंदराव पवार,माजी सरपंच कृष्णात फुले सचिन माने,संग्राम सकुंडे एम.के कदम यांचेसह खर्डेकर समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी केलेल्या आरोपांना उत्तर देताना विशालसिंह माने राजनभाऊ फराटे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामींनाथ साबळे यांच्यावर सडकून टीका केली, त्यावेळी ही जमीन 47500 रुपये ला खरेदी केली होती त्यामध्ये जेष्ठ नेते राजन भाऊ फराटे यांचा काहीही संबंध नाही,ते म्हणत होते की श्रीमंत धीरेंद्रराजे यांनी पगार घेतला नाही, सन 22/23 चा ऑडिट रिपोर्ट नुसार पगार मार्च अखेर पगार देणे बाकी आहे असे दिले आहे, बँक स्टेटमेंट बघा सचिव यांना एक रुपया ही दिला नाही,जर तुम्ही सांगताय की पगार 47 हजार प्रमाणे दिलेत हे चुकीचे असून असे दाखविले तर 47 लाख रुपये देऊ व ते त्यांच्या कडून देऊ असेही माने यांनी स्पष्ट केले,विरोधकांना माझे सांगणे आहे की “आका बोका असे बोलू नये” जमीन विक्री केली ती संस्था आवसायनात निघणार होती तसे झाले असते तर ती जमीन राज्य सरकारकडे गेली असती म्हणून ती सर्व परवानग्या घेऊन जिल्हा वर्तमान पत्रात त्याची जाहिरात देऊन त्याचे व्हॅल्यूशन (शासकीय विक्री किंमत) या प्रमाणे त्या जागेची विक्री केली आहे, व त्या बागायतदाराचे मोठे क्षेत्र आहे त्याचा दरवर्षी 700/800 टन ऊस जातो त्याच्या बँकेतून हे पैसे संस्थेला आले आहेत व ते बँकेच्या अकाउंटला शिल्लक आहेत त्याचबरोबर ती व्यक्ती पुन्हा संस्थेला जमीन देण्यासाठी तयारही आहे असे रघुवीर माने यांनी स्पष्ट केले. आपल्या संस्थेला शंभर वर्षाची परंपरा आहे,विशालसिंह माने तुम्ही कर्ज भरले असते तर लिलाव निघाला नसता,चांगल्या कामात राजकारण आणून संस्थेची व कोणाचीही बदनामी करू नका, बिन बुडाचे राजकारण सुरु आहे, ती जमीन सुरक्षित केली आहे, ते पैशे त्याच संस्थेच्या अकाउंट मध्ये आहेत, संस्था व गावाच नाव बदनाम केले, दीड कोटी रुपये घेऊन या तुम्हाला ती जमीन देतो, तुम्ही संस्थेत सभासद आहात,आम्हाला संस्थेत अजिबात राजकारण करायचं नाही उगाच चिखल फेक करू नका, सर्वांना सातारा, फलटण च्या गादी बद्दल आम्हाला आदर आहे तसाच आम्हाला आसू च्या गादीचा प्रचंड आदर आहे.
चौकट – अजितदादांच्या सभेत श्रीमंतानी म्हटलेवर सर्वच हसले होते पण आमचं एक कुत्र सतत तीच तीच चर्चा करून भू भू करीत असत त्याला राजकारणात खर्डेकर कुटुंबातील लोकांनी आणलं मोठमोठी पदे दिली असा टोला श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामींनाथ साबळे यांना लगावला.