फलटण- जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण रॉबोटिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आपली फलटण मॅरेथॉन” या उपक्रमाला फलटणकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामविकास मंत्री मा.ना. जयकुमार गोरे भाऊ व आमदार मा.श्री.सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या मॅरेथॉनचे उद्घाटन झाले.
या विशेष प्रसंगी मंत्री महोदयांनी आरोग्य, व्यायाम आणि सामाजिक सलोखा यांचे महत्त्व पटवून देणारे मार्गदर्शन केले. त्यांनी या प्रकारच्या उपक्रमांद्वारे तरुणांमध्ये ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रसार होत असल्याचे सांगितले.
मॅरेथॉनमध्ये तरुण, वृद्ध तसेच महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अनेक कुटुंबांनी एकत्र येत मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्याने उत्सवाचे स्वरूप लाभले. विविध वयोगटांतील धावपटूंसाठी वेगवेगळ्या गटांची आखणी करण्यात आली होती, आणि सर्व सहभागींच्या उत्साहाने संपूर्ण फलटण शहरात आनंदाचे आणि आरोग्याचे वातावरण निर्माण झाले.
या मॅरेथॉनचे आयोजन केवळ एक स्पर्धा न राहता, आरोग्य जागरूकता, सामाजिक एकोप्याचा संदेश आणि फलटणच्या सकारात्मक प्रगतीचे प्रतीक ठरले.
आपली फलटण मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रसाद जोशी सर, डॉ शरद धायगुडे, डॉ सुनीता निंबाळकर, डॉ वल्लभ कुलकर्णी, डॉ योगेश बागल, अझरुद्दीन मुजावर, सुरेश कुलकर्णी (जोशी हॉस्पिटल प्रा ली, फलटण) सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.