फलटण प्रतिनिधी – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही व्यक्ती किंवा मुकादम यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही सुषमा अंधारे यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत असे अड. धीरज घाडगे यांनी सांगितले. यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक यांच्या वतीने पन्नास कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीची नोटीस बजावली असून 48 तासांच्या आत जाहीर माफी मागावी असेही सांगितले,तसेच ही पत्रकार परिषद नक्की त्या डॉक्टर युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी घेतली का दिगंबर आगवणे यांच्यासाठी घेतली? असा प्रश्न उपस्थित करीत तुम्ही ज्यांच्या शेजारी बसला आहात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते कोणकोणते त्याची तुम्ही माहिती घ्या व आज केलेले सर्व आरोप लेखी माफी मागा व ज्या ठिकाणी तुम्ही पत्रकार परिषद घेतली तिथंच सर्व आरोप मागे घ्या अशीही मागणी केली आहे. आज शिवसेना नेत्या सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर 277 गुन्हे दाखल केले आहेत त्याला उत्तर देण्यासाठी आज फलटण येथे अड. धीरज घाडगे, अड. नरसिंह निकम,व अड. सचिन शिंदे यांनी त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व आरोपांना सडेतोड उत्तर देत सर्व आरोप धुडकावून लावले, यावेळी अड. धीरज घाडगे यांनी सांगितले की उपविभागीय पोलीस अधीक्षक फलटण यांनी दिलेल्या लेखी माहितीनुसार/पत्रानुसार आजपर्यंत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही पोलीस ठाण्यात व कोणाही विरोधात एकही आरोप/ दावा/गुन्हा दाखल केलेला नाही असे स्पष्ट केले. आज पुणे येथे सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांनी जे बेताल वक्तव्य केले आहेत ते पूर्णपणे खोटे व बिनबुडाचे असून त्यांना आम्ही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावतीने कायदेशीर नोटीस पाठवली असून त्यामध्ये 50 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे,सुषमा अंधारे यांनी या बाबत 48 तासात खुलासा करावा असे अड. घाडगे यांनी सांगितले, त्यांनी सांगितले की 277 खटले केल्याचा आरोप आहे तो पूर्ण चुकीचा असून उपविभाग पोलीस अधीक्षक यानी सांगितले आहे की त्यांच्या नावाने एकही ऊस मुकादम यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले हे चुकीचे आहे. त्या डॉक्टर चा प्रकरणाचा अन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा काहीही संबंध नाही, तसेच आजपर्यंत एकाही ऊस मुकदामाने त्यांच्यवरही कोणता गुन्हा दाखल करण्यात आला नाही, एकही ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल नाही असे स्पष्ट केले,त्या ज्यांच्या बरोबर बसल्या आहेत त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत,अंधारे यांनी प्रेस घेण्यात आले त्या पीडित डॉक्टरच्या घरी गेल्या होत्या का?तसेच नंदकुमार ननावरे यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केले,परंतु त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे की ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव नाही रणजित निंबाळकर या नावाने तब्बल 21 लोक फलटण तालुक्यात आहेत,असेही अड.घाडगे यांनी स्पष्ट केले. ज्या दिगंबर आगवणे यांच्या बाजूने पत्रकार परिषद घेतली त्यांनी अनेक बॅंकांना बुडविले असल्याचा आरोप आहे गुन्हे दाखल आहेत असे अड. घाडगे यांनी स्पष्ट केले.