फलटण – महाराष्ट्र राज्याचे दातृत्व कर्तृत्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना कधीही कोणत्या कामाला कधीही नाही म्हणाले नाहीत असे वक्तव्य माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले,आज त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आली असून देवा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात व राहिले असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर गलिच्छ असे आरोप केले गेले आहे सांगत असताना त्यांचे डोळे भरून आले अन् ते अक्षरशः रडले.
यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की,आज नीरा देवधर च्या कामाचा शुभारंभ होत असून खंडाळा,फलटण माळशिरस,सांगोला, तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होणार आहे त्यासाठी धाडशी निर्णय घेऊ शकतात ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात व फलटण तालुक्यात जे जे मागितले ते दिलं, देव देताना सगळंच देतो तुमची जागा देवासारखीच असल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले,नाईकबोमवाडी एमआयडीसी मध्ये मोठ्या कंपन्या येणार आहेत तसेच फलटण हा जिल्हा लवकरच होईल, मंत्री जयकुमार गोरेनी प्रत्येक कामात मला साथ दिली,माझा पराभव झाला पण मी आमदार दिला, फलटण शहरात 76 टक्के मला 74 टक्के आमदारांना मते मिळाली,मला राजकारणात बदला घ्यायचा नाही बदलावं करायचा आहे, संस्कृती पाळायची, आपण येऊ नये विरोधकांनी मिडिया मध्ये गलिच्छ राजकारण सुरु केले, सोळा वर्षे मी काम करतोय दूध संघ काढला,सर्वात जास्त दर ऊस कारखाना देतो, या दिवाळीत 30 हजार भगिनींची दिवाळी गोड केली,मी कुठंही चहा भेळ वडापाव खातो सर्वसामान्य लोकांच्यात मिसळतो पण यांची जहागिरी गेली परंतु फुगिरी गेली नाही अशी टीका आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वर नाव न घेता केली.