फलटण दिनांक २३ ( प्रतिनिधी )माढा लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा असलेला नीरा देवघर प्रकल्पासह विविध विकासकामांना तातङीने गती देण्याचे आस्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले . सुमारे 3900 कोटींचा असलेल्या नीरा देवघर प्रकल्पाचा समावेश केंद्रीय कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा यासाठी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर व ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली .माढा लोकसभा मतदारसंघाचे मा.खासदार रणजितसिंह नाईक_ निंबाळकर यांनी 2019 पासून सातत्याने या योजने साठी पाठपुरावा करीत आहेत. या दरम्यान CWC ची मान्यता, धरणाची पाणी साठवण क्षमता (हायड्रॉलॉजी) दाखला, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाची विशेष समिती, तसेच राज्य सरकारची शिफारस अशा अनेक टप्प्यांमधून हा प्रकल्प पुढे नेण्यात आला
झालेल्या बैठकीत जलशक्ती मंत्री मा. श्री. सी. आर. पाटीलजी, ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे, मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर CWC चे चेअरमन श्री. अतुल जयंत, सदस्य श्री. पाटणकर, चीफ इंजिनिअर श्री. शेंगर यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासाठी केंद्रीय निधी गुंतवणुकीला अंतिम मान्यता मिळाली. त्यामुळे नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे काम माळशिरसच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यात केंद्रीय निधी उपलब्ध होताच निविदा प्रक्रिया राबवली जाईल. याचबरोबर उरमोडी व जिहे कटापूर योजनांनाही मान्यता व निधी मिळाला आहे.फलटण पंढरपूर रेल्वे सुरू करणे बाबत भरीव निधी ची तरतुद होणार
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी , केंद्रीय जलशक्ती मंत्री मा. सी. आर. पाटील, तत्कालीन मंत्री मा. गजेंद्रसिंहजी शेखावत, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच हे महत्वाकांक्षी प्रकल्प आता गतीमान होत असून लवकरच पूर्णत्वाकडे जाईल.माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ संबंधितांचे मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी सर्वाचे आभार मानले