फलटण : दि. 8 ऑगस्ट 2025 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे घेण्यात आलेल्या कृषी विभागाच्या परीक्षेमध्ये मंगळवार पेठ फलटण येथील कु. प्रतीक्षा गौतम काकडे यांची कडेगाव जि. सांगली या विभागामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी या पदावरती निवड झाली त्यांचे शिक्षण मालोजीराजे ॲग्री कॉलेज फलटण येथे झाले आहे. त्यांची सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून निवड झाल्या बद्दल सर्व समाज बांधवांनी,नातेवाईकांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले तसेच समाजातील विविध घटकांकडून मित्र-मैत्रिणीकडून व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्याकडून प्रत्यक्ष भेटून हार,बुके,शाल देऊन अभिनंदन केले व अनेकांकडून फोनवरून ही शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला…….