जार पिक्चर्स आणि फ्लिप फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘निशानची’ या चित्रपटाचे निर्माते अजय राय आणि रंजन सिंग आहेत, तर दिग्दर्शन सुप्रसिद्ध अनुराग कश्यप यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता ऐश्वर्य ठाकरे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करत आहेत, आणि ते एका दमदार डबल रोलमध्ये झळकणार आहेत. त्यांच्यासोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद झिशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ‘निशानची’ चित्रपट 19 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अमेझॉन MGM स्टुडिओ इंडिया आणि झी म्युझिकने आज अनुराग कश्यप यांच्या आगामी चित्रपट ‘निशानची’ मधील एक रोमँटिक गाणं ‘नींद भी तेरी’ प्रदर्शित केलं आहे. हे गाणं मनन भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलं आहे, त्यांनीच हे गाणं लिहिलं आणि गायलेलंही आहे. त्यांच्या खास शैलीमध्ये बनवलेलं हे गाणं अत्यंत सुकून देणारं आणि भावनिक आहे. प्रेमाच्या नाजूक भावना, मनातील अनकथ भावना आणि नात्यांमध्ये घडणाऱ्या सूक्ष्म बदलांना हे गाणं अतिशय सुरेखपणे उभं करतं.
चित्रपटातील भावनांना अधिक खोलवर पोहोचवण्यासाठी ‘नींद भी तेरी’ या गाण्याचं दुसरं व्हर्जन देखील चित्रपटात समाविष्ट करण्यात आलं आहे, जे मुख्य अभिनेता ऐश्वर्य ठाकरे यांनी स्वतः गायलेलं आहे. ते या चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहेत.