फलटण प्रतिनिधी – सांगवी ता. फलटण जि सातारा येथील त्या डेअरीच्या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून,ते घाण पाणी थेट नीरा नदीपात्रात सोडल्याने हजारो शेतकऱ्यांची जमीन व आरोग्य धोक्यात आले असून उभारलेला प्लांट व असलेली वस्तु स्थिती यामुळे नक्कीच प्रादुशन मंडळ गंधारीच्या भूमिकेत व लाखो रुपयांचा हप्ता घेण्यात दंग असल्याचे भयावह चित्र फलटण तालुक्यात निर्माण झाले आहे.
या अक्षम्य चुकीने लोकांना जर्जर आजाराने पच्छाडले आहे. तसेच नागरिकांच्या व पशु,पक्ष्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांसह, पशूपक्ष्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोठे राजकीय पाठबळ असल्याने प्रशासन या संदर्भातील तक्रारी दडपत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. डेअरीमधील दूषित रसायनमिश्रित पाणी नीरा नदीत सोडले आहे. या पाण्याची दुर्गंधी पसरली असून, प्रवाशांना नाकाला रुमाल लावून येथून प्रवास करावा लागत आहे. केमिकलमिश्रित पाणी असल्याने पाण्याचा रंग देखील केमिकल सारखा झाला आहे. या पाण्यावर सतत फेस येत असतो. याची प्रचंड दुर्गंधी येत आहे. हेच पाणी नीरा नदीतून वाहुन जाऊन परिसरातील नदी काठी अनेक शेतकर्यांनी शेतीसाठी नदीतील पाणी नेत असल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले आहेत, अशी स्थानिक शेतकऱ्यांसह अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.
नीरा नदीवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याद्वारे गंभीर आजार होऊ शकतात. या नदी लगतच वन्य प्राणी याचा वावर आहे. लांडगा, कोल्हा, हरीण, तरस आदी प्राणी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत आहेत. अनेक प्रजातीचे पक्षी येथे आहेत. या वन्यप्राण्यांच्या देखील आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. जल प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे. मात्र तरी देखील कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. ज्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. राजकीय पाठबळामुळे कारवाई होत नसल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. राजकीय दबावाला झुगारून अधिकारी कारवाई करून नागरिकांना न्याय देणार का ? असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत.