फलटण दि. १ : बेस्ट पोलीस पाटील ॲवॉर्ड प्राप्त, गुणवरे, ता. फलटणचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील अमोल आढाव यांची फलटण तालुका पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडीनंतर अमोल आढाव यांच्यासह निवडण्यात आलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ या भिकाजीराव पाटील स्थापित नोंदणीकृत व अधिकृत राज्यस्तरीय संघटनेच्या फलटण तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम येथील माळजाई मंदिरात राज्य संघटनेचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या सूचनेनुसार पार पडला. अध्यक्षस्थानी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा दुधेबावी गावचे पोलिस पाटील हनुमंतराव सोनवलकर पाटील आप्पा होते, तर निरीक्षक म्हणून सातारा जिल्हाध्यक्ष तथा काळज, ता. फलटण येथील पोलिस पाटील प्रदीप गाढवे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फलटण तालुका उपाध्यक्ष वडले, ता. फलटणच्या पोलीस पाटील स्वाती घनवट आणि खटकेवस्ती, ता. फलटणचे पोलीस पाटील राजेंद्र धुमाळ यांची निवड करण्यात आली. तालुका सचिव म्हणून चांभारवाडीचे पोलीस पाटील स्वप्निल धुमाळ यांची निवड करण्यात आली. पोलीस पाटलांच्या विविध मागण्या व संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून पोलीस पाटलांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघ या अधिकृत संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्याने फलटण तालुकाध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. संघटनेचे इतर पदाधिकारी सहसचिव रसिका भोसले पाटील चौधरवाडी, संपर्क प्रमुख हनुमंत सोनवलकर पाटील भाडळी बुद्रुक खुर्द आणि सासकल, संघटक प्रणाली बोडके पाटील विठ्ठलवाडी, मकरंद पखाले पाटील कोळकी, संघटनेचे सल्लागार म्हणून अशोकराव गोडसे पाटील आसू, हनुमंतराव सोनवलकर पाटील आप्पा दुधेबावी, सुरेश चव्हाण पाटील आण्णा चव्हाणवाडी, अमित भोईटे पाटील आरडगाव, प्रदीप गाढवे पाटील काळज यांची निवड करण्यात आली. या निवडीवेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक मठपती, पोलीस अंमलदार सागर अभंग, नंदकुमार खताळ पाटील कापडगाव, सोमनाथ जगताप सल्लागार सातारा, सामाजिक कार्यकर्ते पै. बजरंग गावडे, बजरंग खटके, डॉ. धनाजी आटोळे, प्राचार्य आनंदराव आढाव, प्रा. शिवलाल गावडे, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे सचिव राहुल कणसे, माजी सरपंच मनोज गावडे, पोलीस पाटील गोखळी विकास शिंदे, युवराज सांगळे सर, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट गुणवरे, निलेश गौंड साहेब, मिलिंद नेवसे आप्पा, फलटण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, गोखळी गुणवरे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो : संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर पाटील आप्पा व जिल्हाध्यक्ष प्रदिप गाढवे पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी यांच्यासमवेत नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल आढाव.