फलटण – फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथील एमआयडीसीमध्ये नवीन उद्योगधंदे आणण्याबाबत माजी खासदार नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथे नवीन औद्योगिक वसाहत उभी राहत असून या ठिकाणी नवीन उद्योगधंदे आणण्याबाबत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सविस्तर चर्चा केली . नाईकबावाडी औद्योगिक वसाहतीतील उद्योग धंद्याबाबत सहकार्य करण्याची ग्वाही मंत्री पियुष गोयल यांनी दिली यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथील औद्योगिक वसाहती बाबत सुद्धा चर्चा करून येथे नवीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर व उद्योगधंदे उभारण्याबाबत चर्चा केली.