निराधार लोकांची सेवा करताना अनंत अडचणी, सरकारकडून साधी जागा उपलब्ध होत नाही याची खंत – हनुमंत मोरे मामा
फलटण प्रतिनिधी – जनसेवा हीच ईश्वर सेवा हे आपण ऐकतो बोलतो ती करतोही मात्र ते करीत असताना केंद्र व राज्य सरकारचे सरकारी बाबू तसेच त्या प्रशासनातील उदासीनतेमुळे फलटण तालुक्यामध्ये बेघरांना निवारा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही ही दुर्दैवीबाब असल्याची खंत मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे मामा यांनी बोलून दाखविली यामुळे तब्बल पंधरा वर्षे त्या निराधारांची सेवा मनोभावी केली मात्र त्यांना एकत्र आणून त्यांची अजून सुलभ व सुटसुटीत सेवा करण्याचा मानस आहे मात्र त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार तसेच मायबाप जिल्हाधिकारी/नगरपालिका यांचेकडे सर्व पूर्तता केली मात्र तरीही शासकीय जागा उपलब्ध करून दिली जात नाही असे आवर्जून सांगितले.
मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था,काळूबाईनगर,फलटण या संस्थेच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता या क्षेत्रात काम कारणाऱ्या फलटण तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मोरेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष हनुमंत मोरे (मामा) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना मोरे मामा यांनी सांगितले की ही संस्था गेली पंधरा वर्षे अविरतपणे बेघर, मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांसाठी सामाजिक कार्य करत आहे परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे फलटण तालुक्यामध्ये बेघरांसाठी निवारा उभा करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली जात नाही, तसेच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून वेळोवेळी मदत मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार ही मानले तसेच पुढील काळात फलटण तालुक्यातील पत्रकार बांधव संस्थेच्या पाठीशी समर्थपणे उभा राहतील अशी अशा व्यक्त केली यानंतर उपस्थित फलटण तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने युवा जनमतचे पत्रकार युवराज पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन मनोगत व्यक्त करताना पुढील काळात मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्थेसाठी प्रशासनाकडून जागा मिळवून देण्यासाठी सर्व पत्रकार बांधव संस्थेसोबत प्रशासनाचा पाठपुरावा करतील अशी ग्वाही दिली.या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते बच्चुभाऊ मेहता,जेष्ठ पत्रकार पोपट मिंड, पत्रकार यशवंत खलाटे पाटील, योगेश गंगातीरे, प्रशांत रणवरे,अमोल पवार, आनंद पवार, प्रमोद सस्ते अशा सर्व उपस्थित मान्यवर व पत्रकारांचे सत्कार संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे (मामा)सचिव सौ. निर्मला मोरे मॅडम,खजिनदार तथा सामाजिक कार्यकर्ते अक्षय तावरे, संस्थेच्या सल्लागार अँड.सौ.शारदा दिक्षित मॅडम,सदस्य अनिल कुंभार,सदस्य मोहन अलगुडे,सदस्य रवीद्र भिसे,सदस्या सौ.सुरेखा घाडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण (बापू)गायकवाड़,अर्जुन राऊत, सौ.आलका कुंभार यांच्यावतीने ग्रामस्थ आणि सभासद यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचे स्वागत व आभार मनन्यात आले. फलटण – मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्थेचा पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार बंधुचा सत्कार करताना बच्चू शेठ मेहता यावेळी उपस्थित हनुमंत मोरे, अक्ष्य तावरे व इतर