फलटण प्रतिनिधी – फलटण शहरातील महावितरण ग्राहक यांना कळविणेत येते की मंगळवार दि.23 सप्टेंबर रोजी HT/LT लाइन व DTC मेंटेनन्सच्या कामाकरिता 22KV फलटण शहर वाहिनी वरील सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे असे अभियंता ननावरे यांनी सांगितले आहे. या मध्ये मलठण, जिंतीनाका, शेतीशाळा, स्वामी विवेकानंदनगर, बिरदेवनगर, तांबमाळ, भडकमकरनगर,पद्मावतीनगर, बारस्करगल्ली,ईत्यादी ठिकाणी 22KV Y.C. फिडर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहील. व कोळकी, सोमवार पेठ,मंगळवार पेठ,मार्केट यार्ड, ईत्यादी वरील फिडर वरील काम लवकर झाले तर अगोदर सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. कृपया याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे महावितरण च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.