फलटण प्रतिनिधी – सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) म्हणून फलटण येथे कार्यरत असलेले जे. पी. गावडे यांची प्रादेशिक उपसंचालक (साखर) म्हणून पदोन्नती झाली असून, त्यांची नियुक्ती सोलापूर येथे करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
गुणवरे फलटण चे सुपुत्र जे. पी. गावडे यांची पदोन्नती गट–ब संवर्गातून उपनिबंधक, सहकारी संस्था गट–अ संवर्गात करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कामकाजाची दखल घेत ही पदोन्नती देण्यात आली आहे.त्यांनी यापूर्वी या विभागात जे. पी. गावडे हे गुणवरे (ता. फलटण) येथील सुपुत्र असून, फलटण तालुक्यातील नागरिकांच्या विविध अडचणी सोडवण्यात ते नेहमीच पुढाकार घेतात.त्यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक व इतर सर्वच स्तरावर्ती अगदीच घरोब्याचे व मैत्रीचे ऋणानुबंध असून त्यांच्या लोकसंपर्क व सहकार्य वृत्तीमुळे त्यांना सर्व स्तरातून हजारो लोकांनी प्रत्यक्ष,दूरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या दरम्यान या पदोन्नती मुळे फलटण च्या सुपुत्राला नक्कीच या क्षेत्रात उल्लेखनीय काम करून आपल्या गुणवरे गावाची शान वाढणार आहे.