
फलटण —- रक्षक रयतेचा न्युज तर्फे घेण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेमध्ये सौ पूनम नितीन रणवरे यांचा प्रथम क्रमांक तर सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सौ श्रद्धा बाचकर यांचा प्रथम क्रमांक आला आहे. अत्यंत उत्साही वातावरणात बाप्पाचा जयघोष करीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
रक्षक रयतेचा न्यूज,गगनगिरी ज्वेलर्स फलटण, सहयोग सोशल फाउंडेशन फलटण, शार्विच कॉस्मेटिक अँड ज्वेलरीब्युटी पार्लर फलटण,मूळचंद मिल,भारतीय हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर आणि डेंटल क्लिनिक फलटण, चैतन आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र फलटण व कॉर्नर मोबाईल इलेक्ट्रॉनिक फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुक्यातील महिलांसाठी भव्य गौरी सजावट आणि पुणे सातारा जिल्ह्यातील महिलांसाठी सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही स्पर्धेमध्ये 150 स्पर्धक सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटामाटात टेलिफोन एक्सचेंज शेजारील नगरपालिकेच्या नवीन हॉल मध्ये पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यात्मिक क्षेत्रातील परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून के. बी.उद्योग समूहाच्या संचालिका सौ सुजाताताई सचिन यादव, नवनिर्माण सेवास संघाच्या अध्यक्षा सौं कल्पनाताई गिड्डे, फलटण नगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक मोहनकुमार शिंदे व शशिकांत शिरतोडे,नगरपालिकेचा सी एल एफ अध्यक्षा मालन गोडसे सचिव सपना गायकवाड व्यवस्थापक सौं विद्या रिटे, सहाय्यक सुप्रिया फडतरे, नगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेच्या स्थापत्य अभियंता सिमरन पठाण, भारती हॉस्पिटल भारती हॉस्पिटलच्या डॉक्टर पूजा शिंदे, शार्विज कॉस्मेटिक आणि ब्युटी पार्लरच्या सौं नुपूर शहा,गगनगिरी ज्वेलर्सचे प्रमुख रवीराज शहाणे,कॉर्नर मोबाईल शॉपी चे तुषार माने,मूलचंद Smart नरेंद्रकुमार, चैतन्य आयुर्वेदिक पंचकर्मचे डॉक्टर जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते रेवडेदादा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी या स्पर्धा अतिशय चुरशीने झाल्या स्पर्धेमध्ये हार जीत असते. त्यामुळे ज्यांना बक्षिसे मिळाली नाहीत त्यांनी नाराज न होता आणखी प्रयत्न करावेत. जीवनात हार जीत असतेस त्याला सामोरे गेले पाहिजे. रक्षक रयतेचा न्यूजतर्फे महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा तसेच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजन केले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सौ सुजाताताई यादव यांनी आपल्या भाषणामध्ये रक्षक रयतेचा न्यूज तर्फे प्रत्येक उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतले जात असून रक्षक रयतेचा न्यूजने अल्पावधीतच चांगला ब्रँड निर्माण केला आहे. केबी उद्योग समूहातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. केबी कंपनी असो किंवा गॅलेक्सी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असो या माध्यमातून सामान्य माणसांना आधार देण्याचे काम सचिन यादव यांनी केलेले आहे. आज या माध्यमातून हजारो जणांना रोजगार मिळाला असून महिलांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी आणखी प्रयत्न केले जातील. केबी उद्योग समूह नेहमी रक्षक रयतेचा न्यूजच्या पाठीशी राहील भविष्यात आणखी चांगले कार्यक्रम घेतले जातील अशी ग्वाही सौ सुजाताताई यादव यांनी दिली.
सौ कल्पनाताई गिड्डे यांनी रक्षक रयतेचा न्यूज तर्फे महिलांसाठी चांगले उपक्रम राबविले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून आमची संघटना व रक्षक रयतेचा न्यूज च्या माध्यमातून एकत्रितरित्या यापुढे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील महिलांच्या उन्नतीसाठी नेहमी आमचा पुढाकारच असेल. या स्पर्धांना महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे स्पर्धेमध्ये हारजीत असते त्यामुळे याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. दिवसेंदिवस महिला वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून महिलांनी आणखी सक्रिय व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
मोहनकुमार शिंदे यांनी फलटण नगरपालिके मार्फत विविध बचत गट व व्यावसायिक महिलांना अल्प दरात कर्ज सुविधा विषयी मार्गदर्शन केले जात असून बचत गटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यावेळी त्यांनी महिलांना शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान आवास योजनेविषयी सिमरन पठाण यांनी माहिती दिली. रक्षक रयतेचा न्युज चे संपादक नसीर शिकलगार यांनी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
गौरी सजावट स्पर्धा आणि सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेमध्ये विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे
गौरी सजावट स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक सौ पुनम नितीन रणवरे (राधाकृष्ण देखावा), द्वितीय क्रमांक सौ रूपाली धीरज टाळकुटे -( भिडे वाडा) ,तृतीय क्रमांक सौ.रूपाली निलेश पोतेकर-( नारीशक्ती) चतुर्थ क्रमांक सौ.रेश्मा धनंजय कदम – (गुरुचरित्र) ,पाचवा क्रमांक सौ स्नेहल खलाटे( इंडियन आर्मी) उत्तेजनार्थ बक्षीस सौ.ऋतुजा विनोद घाडगे (स्त्री जीवन) सौ .शुभांगी धनंजय ओतारी( जागरण गोंधळ) सौ. अक्षदा सुतार – (जोतिबा मंदिर)
सेल्फी विथ बाप्पा यामध्ये प्रथम क्रमांकसौं श्रद्धा बाचकर, द्वितीय क्रमांक अर्चना पिसे, तृतीय क्रमांक सोनाली गायकवाड, चतुर्थ क्रमांक अमृता कोंडके पाचवा क्रमांक धनलक्ष्मी बर्वे यांचा क्रमांक आला. कार्यक्रमास उपस्थित महिलांमधून सुद्धा लकी ड्रॉ काढण्यात आले. या लकी ड्रॉ द्वारे पैठणी, इस्त्री, ज्यूसर, वेगवेगळे गिफ्ट हॅम्पर देण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि हमखास गिफ्ट देण्यात आले. दोन्ही स्पर्धेसाठी स्वतंत्ररित्या प्रथम क्रमांकाला एक ग्रॅम फॉर्मल नेकलेस, द्वितीय क्रमांकासाठी पैठणी, तृतीय क्रमांकासाठी आकर्षक गिफ्ट हॅम्पर,चतुर्थ क्रमांकासाठी डिनर सेट देण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धनवडे कमलेश भट्टड, तात्यासाहेब गायकवाड, इम्तियाज तांबोळी,प्रशांत दोशी, नामदेव शिंदे, रवी साळुंखे, सौ नंदा बोराटे,सौ रूपाली कचरे सौ असिफा शिकलगार,नीता दोशी,सौं मनीषा घडिया, सौं सविता गायकवाड, सौ सुवर्णा शिंदे, उज्वला गोरे,सौ अनुराधा रणवरे सौ प्रियांका सस्ते अभिषेक धनवडे यांनी परिश्रम घेतले.
