फलटण प्रतिनिधी – धुळदेव ता. फलटण येथे ग्रामसभेत गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांच्या समोर च प्रश्न विचारणाऱ्या ग्रामस्थांना महिला ग्रामपंचायत सदस्याचे पती यांनी अरेरावी केली असल्याची घटना घडली असून म्हणे मी बांधलेल्या ग्रामपंचायती मध्ये तुम्ही उभे आहात हे विसरू नका अशी अरेरावी केल्याने ज्या अधिकारासाठी राज्य सरकारने ग्रामसभा घेणे व सर्व अधिकार वापरावे अशा सूचना असताना ही दमदाटी झाल्याने फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. धुळदेव ग्रामपंचायती मध्ये आज बुधवार दि. 17 रोजी प्रभारी गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सध्या धुळदेव ग्रामपंचायती मध्ये सरपंच पद रिक्त असल्यामुळे नामधारी उपसरपंच कारभार पाहतात असे असताना सुद्धा आज आयोजित ग्रामसभेस उपसरपंच यांनी या ग्रामसभेस पाठ केली असल्याने चर्चेला उधाण आले होते. ऐनवेळी ग्रामपंचायती च्या जेष्ठ सदस्या तांबे यांना अध्यक्षपदी बसविण्यात आले . ग्रामसभा सुरु झाल्यावर ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना या अध्यक्षा कोणतेही उत्तर देत नव्हत्या माञ तेथे उपस्थितीत गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांच्या समोर च पाण्याबाबत आणि गटारी बाबतप्रश्न विचारणाऱ्या ग्रामस्थांना महिला ग्रामपंचायत सदस्याचे पती यांनी चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप करीत अरेरावी करीत मी स्वखर्चाने बांधलेल्या ग्रामपंचायती मध्ये तुम्ही उभा आहे. या ग्रामपंचायती मध्ये मी म्हणेल तेच होत असते विशेष म्हणजे या ग्रामसभेस त्या विद्दमान सदस्या अनुपस्थित होत्या यामुळे धुळदेव ग्रामपंचायत कारभाराचा आता जिल्हा परिषद व फलटण पंचायत समिती कोणती भूमिका घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.