फलटण प्रतिनिधी – फलटण पंचायत समितीचा कारभार दररोज चव्हाट्यावर येत असून आता तर एका कर्मचाऱ्याने हद्दच केले तो बसला टेबलवर पाय ठेवलेत खुर्चीवर यामुळे अशा कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी काय व कोणती हे कोण समजावणार व अशा कर्मचाऱ्यांवर कोण कठोर कारवाई करणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
गेली तीन वर्षे हून अधिक काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने सर्वच ठिकाणी अधिकाऱ्यांच्या तथा प्रशासकाच्या हाती या सर्व संस्थांचा दोर आहे मात्र आज फलटण पंचायत समितीच्या कार्यालयात एका उद्दाम कर्मचाऱ्याने कहरच केला शेकडो लोक पंचायत समिती कार्यालयात ये जा करीत असताना त्याने चक्क टेबलवर बसून खुर्चीवर पाय दिल्याचे चित्र पाहायला मिळाले यामुळे अशा लोकांना आपली सेवा आपले कर्तव्य माहित आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. फलटण पंचायत समितीमध्ये अनेक विभागात अधिकारी आपल्या मनमानी कारभारामुळे अनेक वेळा उघडे पडलेले असताना त्यांना प्रभारी गटविकास अधिकारी समज देत ना जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी ना राजकीय मंडळी यामुळे अशा लोकांच्या मनमानी कारभाराचा फटका फलटण तालुक्यात बसत असून अशा लोकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.