फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांचा 73 वा.वाढदिवस निसर्ग हॉटेल येथे साजरा होणार.
फलटण तालुक्यातील आदरणीय समाजसेवक आणि माढा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू, आमदार सचिन कांबळे पाटील यांचे जवळीक प्रल्हादराव साळुंखे (पाटील) तात्या यांचा वाढदिवस येत्या सोमवार ६ तारीख रोजी हॉटेल निसर्ग येथे पार पडणार आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे वाढदिवसाचा सोहळा साध्या पद्धतीनेच आयोजित करण्यात आला असून, सहभागी लोकांनी हार, पुष्पगुच्छ वा भेटवस्तू घेऊन येणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी ९ वाजता सुरू होऊन दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार आहे.
प्रल्हादराव साळुंखे हे फलटण क्षेत्रातील सामाजिक, शेतकरी लोकांचे कैवारी सामाजिक बांधिलकीसाठी ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक सहकार्यकारक कार्यक्रमात सहभागी होतील. गेल्या अनेक काळापासून फलटणच्या सामाजिक विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे आणि त्यामुळे त्यांचा सत्कार विविध दिग्गज राजकारणी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमात होणार आहे.