फलटण : फलटण नगरपालिकेच्या हद्दीत केंद्रीय रस्ते विकास निधीतून साकारत असलेल्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या पालखी मार्गाच्या कामामूळे फलटण मधील नागरिकांच्या वाट्याला भितीदायक आणि गैरसोयीचा सामना करण्याची वेळ आली असून या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण काम करणारा ठेकेदार आणि त्याच्यावर मेहेरबानी करणारे बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासाठी मात्र हा रस्ता मलिदाप्रातीचा ठरत आहे. पिरॕमिङ चौक ते जिंती नाका या पालखी मार्गासाठी तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते विकास मंञी नितिन गङकरी हे फलटण येथे आले असताना त्यांच्या कङे आग्रह करुन मंजूर करुन घेतला या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ८० कोटी रुपयांच्या निधी प्राप्त झाल्यानंतर या पालखी आगमनापुर्वी या कामाचा मोठा गाजावाजा करून नारळ फोडण्यात आला. मात्र, या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम ठेकेदाराने अद्यापही पूर्ण केलेले नाही. विशेष म्हणजे, जेवढे काम केले तेही अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्याला तडे जावून ठिकठिकाणी दोन तुकडे पडले आहेत. काही ठिकाणी काँक्रिटीकारणदेखील अर्धवट ठेवल्याने खड्डे निर्माण झाले आहेत त्यामुळे या अर्धवट रस्त्यावरून येता जाताना जीव मुठीत धरुन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण काम करणारा ठेकेदार आणि त्याच्यावर मेहेरबानी करणारे बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासाठी मात्र हा रस्ता मलिदाप्रातीचा ठरत आहे.