दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि ग्रामविकास मंञी जयकुमार गोरे यांनी घेतली सदिच्छा भेट.
फलटण दिनांक २३ ( प्रतिनिधी ) दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि ग्रामविकास मंञी जयकुमार गोरे यांनी सदिच्छा भेट घेऊन केंद्रीय रस्ता निधी (C.R.F.) अंतर्गत विविध रस्ता विकास निधी अंतर्गत कामांना मंजुरी मिळणेबाबत निवेदन सादर केले.
या भेटीत राज्यातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी,महामार्ग प्रकल्पांच्या मंजुरीसाठी तसेच प्रलंबित कामांच्या त्वरीत पूर्णतेसाठी सविस्तर चर्चा केली. शेतकरी बांधव व जनतेच्या दळणवळण सुविधेत सुधारणा होण्यासाठी केंद्रीय रस्ता निधी (C.R.F.) अंतर्गत विविध रस्ता विकास निधी अंतर्गत कामांना मंजुरी मिळणेसं निवेदन सादर केले.
मा. गडकरीजींनी सकारात्मक प्रतिसाद देत विविध विकासकामांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी मा.सभापती किशोर सुळ पाटील ,अमोलशेठ यादव आदी मान्यवर उपस्थित होते .