दहिवडी:-दहिवडी पोलीसांनी विहिर,बोरवेल वरील मोटार/केबल, शासकीय गोदाम, जिल्हा परिषद शाळेतील तांदूळ व गैस सिलेंडर, व्यायम शाळेचे साहित्य चोरी करणाऱ्या चोरांना अटक करुन एकूण ०९ गुन्हे उघडकीस आणून संशयित चोरांकडून तब्बल १२ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिलेली माहिती अशी की,दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या विहिरी वरील/बोअरवेलवरील मोटार, केबल चोरी,तसेच शासकीय धान्य गोडावुन व जिल्हा परिषद शाळेतील तांदुळ व गॅस टाकी, दहिवडी येथील सिध्दनाथ मंदिरा जवळ असलेल्या तालीमीतील व्यायम शाळे मधील साहित्य चोरी झाल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या.
या अनुषंगाने यामधील अज्ञात आरोपी यांचा दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे स्वतः त्यांच्या स्टाफसह शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या विहिरीवरील /बोरवेलवरील मोटार, केबल तसेच शासकीय धान्य गोडावुन व जिल्हा परिषद शाळेतील तांदुळ व गॅस सिलेंडर, दहिवडी येथील सिध्दनाथ मंदिरा जवळील तालीमीतील व्यायम शाळे मधील साहित्य चोरी मधील संशयित आरोपी यांची माहिती मिळाली.
यामध्ये संशयित आरोपी १) प्रविण बापुराव चव्हाण,२) प्रशांत बापुराव चव्हाण,३) विकास तानाजी चव्हाण,४) सुमीत रामचंद्र पाटोळे ,५) अनिल नंदकुमार दळवी,६) मुकेश आबा अवघडे, ७) सौरभ संतोष अवघडे,८) गौख संजय चव्हाण, ९) अजय आणंदा चव्हाण ,व एक१०) विधीसंघर्ष बालक ( सर्व रा.दहिवडी ता.माण,जि.सातारा) अशी असल्याचे निष्पंन्न झालेने त्यांच्याकडून दहिवडी पोलीस यांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ९ गुन्हे उघडकीस आणले.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने ओमनी गाडी क्र.एम.एच.१२ पी.एन.१२४७,पल्सर एम.एच.११ सी.बी.८०८३,हिरो.होन्डा स्प्लेंडर एम.एच.११ बी.एन.७५६५ नंबर नसलेली कावासाकी बॉक्सर अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर,उपविभागीय पोलीस अधीकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे,महिला पोलीस उप निरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, पोलीस उप निरीक्षक गुलाब दोलताडे, सहा.पो.उपनिरीक्षक प्रकाश खाडे, पो.हवा. बापु खांडेकर, तानाजी काळेल, विजय खाडे, रामचंद्र गाढवे, नितीन धुमाळ, पो.कॉ.अजिनाथ नरबट,निलेश कुदळे, महेंद्र खाडे,गणेश खाडे यांनी केलेली आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत.