फलटण पूर्व भागातील आसू येथे ऐन गणपती उत्सवामध्ये अवैध दारू विक्रेते यांच्या घरावर रेड करण्यात आली.त्या अवैध दारू विक्रेत्याला मारहाण पण करण्यात आली त्याची चर्चा जोरात सुरू असताना च मात्र त्या अवैध दारू विक्री प्रकरणावर कोठेही गुन्हा नोंद झालेला नाही. अंबर दिवा लावलेली गाडी कोणाची ?मग ती गावात आलेली गाडी कोणाची? या बाबत संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. फलटण तालुक्यातील आसू,पवारवाडी, हणमंतवाडी, गुणवरे, आदी गावात अवैध्य दारू विक्रीने हौदस घातला आहे .या विक्रेत्यांना कोणाची भीती राहिली नाही.ते कोणालाच घाबरत नाहीत.त्यातच हातभट्टीची दारू कमी पैश्यात मिळते व त्यातून बक्कळ पैसा मिळतो पैश्याच्या जोरावर संबंधित विभाग काहीच करू शकत नाही . गणेश उत्सवात रात्री ८.३० च्या सुमारास सायरन असलेली गाडी आसू गावातील मुख्य चौकात असलेल्या दारू विक्रेते च्या घरी गेली मोठा मुद्देमाल सापडला त्यातील कर्मचाऱ्यांनी त्या विक्रेत्या ला मारहाण केली. मात्र ही गाडी पोलिस किंवा अन्य कोणाची होती याबाबत काहीच माहिती मिळत नाही.या बाबत बरड व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे का या बाबत माहिती घेतली असता.पोलिसांनी सांगितले की आम्ही या बाबत अशी कोणतीच कारवाई केली नाही. व अशी कोणतीच नोंद झाली नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे ती गाडी कोणाची ? या बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत गत महिन्यात ही एक गुटखा विक्री करणाऱ्या युवकाला ढवळेवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या ओढ्यालगत थांबवून त्याच्याकडून ही ४० हजार रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला होता याची पण नोंद कुठे झालेली नाही.त्यामुळे या भागात नक्की कारवाई साठी कोण येतेय हे पोलिसांना माहीत नाही.त्यामुळे कारवाई होते मात्र गुन्ह्याची नोंद होत नाही.मग ती गाडी कोणाची फिरते प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या धंद्यावर कारवाई करणारी गाडी कोणाची मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचा संशय या निमित्ताने होत आहे.