बांधकाम व्यावसायिकाने चक्क रस्त्यावरच चिखलाचे साम्राज्य केल्याने जाधववाडी भागातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट , संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाईची मागणी
फलटण प्रतिनिधी – फलटण गिरवी रस्त्यावर सुरू असलेल्या एका कामामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.बांधकाम व्यावसायिकाने चक्क रस्त्यावरच चिखलाचे साम्राज्य केल्याने जाधववाडी भागातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. जाधववाडी येथे एका बांधकाम व्यावसायिकांचे काम सुरू असून त्या व्यावसायिकाची मोठी वाहने ही फलटण गिरवी रस्त्यावरून ये जा करीत असून या वाहनातून मोठ्या प्रमाणात चिखल रस्त्यावर पडत असून यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता असून हा व्यासायिक राजरोज पणे राडारोडा वाहतूक करीत आहे तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी त्या व्यावसायिकावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. काही दिवसापासून फलटण सह तालुक्यात पाऊस पडत असून पावसामुळे जो चिखल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हा रस्ता निसरडा होऊन मोठे अपघात घडू शकतात अशा निर्ढावलेल्या व्यावसायिकांवर कारवाई कराच अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.