फलटण प्रतिनिधी -शताब्दी वर्षाची फलटण तालुक्यातील अग्रगन्य असलेली सहकारातील एकमेव संस्था आसू नंबर 1 विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या सोसायटीच्या माध्यमातून सभासदांसाठी 15 टक्के लाभांश वाटपाची परंपरा याही वर्षी जपली असून सोसायटीच्या सभासदांच्या खात्यावरती 15% लाभांश जमा झाला असल्याचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले
आसू तालुका फलटण येथील आसू नंबर एक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ने दिपावली च्या अगोदरच सभासदांच्या खात्यात 15 टक्के लाभांश जमा करण्यात आला.यावेळी आसू नंबर एक सोसायटी चे चेअरमन रवी ढवळे,व्हाइस चेअरमन जगन्नाथ ताम्हणे यांच्या सह संस्थेचे संचालक किरण घाडगे , रामदास माने ,आनंदराव पवार, जाकीर शेख सदाशिव गोसावी ,संदीप घोरपडे, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. आसू नंबर एक सोसायटी च्या माध्यमातून सर्व सभासदांसाठी आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्नशील असून सभासदांचे हित जोपासण्यासाठी आपण प्रयत्न शील असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले. आसू नंबर एक सोसायटी भविष्यात शतक महोत्सवी वर्षात सभासदांचे हित जोपासण्यासाठी व विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे अनेक सभासदांचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ही यावेळी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव,सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
फलटण – आसू सोसायटी नं 1 च्या वतीने 15 टक्के सभासदांना लाभांश वाटप करताना चेअरमन, व इतर संचालक मंडळ व इतर