फलटण : आगामी गणपती विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी महावितरण विभागाकडून मिरवणूक मार्गावरील एचटी/एलटी लाईनची पाहणी करण्यात आली.
महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप ग्रामोपाध्ये यांनी स्वतः मार्गाची पाहणी करून, ज्या ठिकाणी लाईन खाली आहेत त्यांची योग्य ती दुरुस्ती व नियोजन करण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. आर. लोंढे, शाखा अभियंता फलटण शहर-1 दिनेश जोनवाल, शाखा अभियंता रविंद्र ननवरे उपस्थित होते.
गजानन चौक ते पाचबत्ती चौक असा पायी फेरफटका मारून महावितरण अधिकाऱ्यांनी लाईनची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी महावितरणचे स्टाफ तसेच गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ज्योतिराम दडस, नितीन भगत, विशाल कणसे, सचिन निंबाळकर आदी उपस्थित होते. 000